पांढरवस्तीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माता पिता यांचे पूजन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, चोपडज विद्यालयात माता पिता यांचे पूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता, आज्ञाधारकपणाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यासाठी या संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी हभप स्वप्नील महाराज काळाने, आकाश महाराज जगताप व त्यांचे सहकारी यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पाहून विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे उपस्थित पालक भावनिक झाले.
याप्रसंगी वाकी गावचे सरपंच किसन बोडरे, चोपडजचे माजी सरपंच राजेंद्र गाडेकर, पळशीचे माजी सरपंच बाबासाहेब चोरमले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पांढरवस्ती, वाकी, चोपडज, कानडवाडी, पळशी, नाईकवाडी, मगरवाडी, मोराळवाडी इ. गावातील विद्यार्थ्यांचे माता-पिता, आजी-आजोबा व पालक उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जे. इनामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब भापकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अरविंद फरांदे यांनी मानले.