करंजे येथे शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
करंजे येथील सोमेश्वर देवस्थान येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 29 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर सर, उपप्राचार्य डॉ.शरद गावडे सर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसरात स्वच्छता केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळवाडी करंजे येथील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व व त्यांच्यासाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा आणि खाऊचे वाटप केले. लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती या विषयावरती जनजागृती रॅली सादर करण्यात आली.
जलसंवर्धन अंतर्गत सलग समपातळी चर खोदाई व वनराई बंधारे विद्यार्थ्यांनी बांधले. डॉ. संजय देवकर, डॉ. शरद गावडे, प्राध्यापक राजेश निकाळजे, प्रा.चिन्मय नाईक, प्रा.शुभम ठोंबरे व चेतन टिळेकर यांनी अनुक्रमे ऊर्जा संवर्धन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कृषी क्षेत्रातील फायदे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील संत आणि त्यांचे योगदान, महाराष्ट्रातील गड किल्ले आणि दुर्ग बांधणी, पर्यावरण आणि जैवविविधता, शिवपुराण या विषयावर व्याख्यानमाला सादर केली. तसेच संस्थेचे संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर यांनी शिबिरार्थींना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व आधुनिक शिक्षणपद्धती याबद्दल मार्गदर्शन केले.
या श्रमसंस्कार शिबिरास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, किसनराव तांबे व प्रवीण कांबळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेतले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश काटे, प्रा.कय्युम आत्तार, प्रा.सायली कदम व सहभागी शिबिरार्थी यांनी पाहिले. या शिबिरास संस्थेचे संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, उपप्राचार्य डॉ. शरद गावडे, सर्व प्राध्यापक, देवस्थान ट्रस्ट समिती, करंजे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.