निर्मला घुले- चोरमले यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
शेतकरी कुटुंबातील निर्मला जनार्दन घुले रा. ढेकळवाडी, (ता. बारामती) यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महसूल सहाय्यकपदी यश मिळालं त्याबद्दल त्यांचे आहिल्याभवन हरिकृपा नगर, बारामती येथे प्रथमताच निर्मला घुले यांचा सत्कार माणिकराव सोनवलकर पाटील संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आयोजित केला होता.
निर्मला घुले या पळशी (ता.बारामती) गावच्या कन्या असून त्यांचे माहेर ढेकळवाडी हे आहे.
यावेळी भगवानराव देवकाते, बबनराव शेळके, अहिल्याभवनचे अध्यक्ष गोविंदराव देवकाते, कार्यक्रमाचे संयोजक शिवराज जाचक, सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते, राजेश कांबळे, भारत रामचंद्रे, जनार्धन घुले, कुलदीप निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माणिकराव सोनवलकर पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्वामी समर्थ यांची प्रतिमा भेट देऊन निर्मला घुले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माणिकराव सोनवलकर पुढे म्हणाले की, सामाजिक काम करत असताना खेड्यापाड्यातील मुलं मुली उत्तुंग यश मिळवत आहेत त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत पुढे नेण्याचं काम महसूल सेवेच्या माध्यमातून निर्मला घुले करतील. त्यांनी येथेच न थांबता पुढे यशाचं पाऊल उचलावे आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग पुन्हा एकदा बारामतीकरांना घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजक शिवराज जाचक हे गुणवंत स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन सत्कार करतात. त्यांच्या या उपक्रमाचे माणिकराव सोनवलकर पाटील यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनील देवकाते पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. अहिल्याभवनची निर्मिती सामाजिक कामासाठी मोठ्या ताकदीने, हिमतीने पुढे नेण्याची परंपरा जपण्याचे काम केले जाईल असे गोविंदराव देवकाते यांनी यावेळी विचार व्यक्त केले. सर्वांचे आभार मानताना निर्मला घुले यांनी महसूल सहाय्यक पदावरती न थांबता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाण्याचा मानस व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page