लोणी भापकर येथे फार्मर आयडी (अग्री स्टॅक) कॅम्प संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी फार्मर आयडी (अग्री स्टॅक) कॅम्प घेण्यात आला. बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोणी भापकर मंडल अधिकारी कार्यालय येथे बाजाराच्या दिवशी हा कॅम्प घेतल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्ड काढण्यासाठी हजेरी लावली.
यावेळी लोणी भापकरचे मंडल अधिकारी संतोष नलवडे, ग्राम महसूल अधिकारी संदीप भांडवलकर, श्रावणी गजभिये, सोनाली गायकवाड, मोनिका सुळ, विकास बारवकर, ग्राम महसूल सेवक शेखर खंडाळे, पोलीस पाटील संजय गोलांडे, लोणी भापकर मदतनीस सुनील मोरे, सचिन पाटील, लोणी भापकरचे संगणक चालक सुनील लडकत तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.