सुशीला तुकाराम मोटे यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : बारामती
२६ जानेवारी २०२५ या दिवशी देशाचा स्वातंत्र दिवस, आनंद उत्सव यानिमित्त राष्ट्रप्रेमी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कुशीत वाढलेले बारामतीचे तरुण तडफदार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य अविनाश मोटे चेअरमन जननिधी को-ऑपरेटिव्ह बँक यांनी त्यांच्या आई श्रीमती सुशीला तुकाराम मोटे यांचा आज ७५ वा वाढदिवस ग्रंथतुला करत असताना गोड भोजन देऊन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला.
अविनाश मोटे यांचे वडील तुकाराम मोटे हे छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर या शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचं नुकतेच दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्या दुःखातून ते सावरले ते केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत वाढलेल्या या हाडाच्या कार्यकर्त्याला संघाचे संस्कार होते. त्या संस्कारातून ते पुढे आले आपल्यासारखाच आपला मुलगा मास्तर व्हावा कुठेतरी नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती, परंतु लहानपणापासूनच रक्तात देशसेवा, समाजसेवा आणि जिथे जाईल तिथे बंड करायच हे ठरलेलं समीकरण त्यामुळे करमाळ्यावरून आलेल्या मोटे परिवाराला बारामतीत मोठे यश मिळवून देण्याचे काम अविनाश यांच्या राजकीय कर्तृत्वामुळे पुढे आले आणि वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम सामाजिक कामातून मोठं होतं हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी आज आईच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. प्रत्येक आईच्या पोटी “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या ओवीप्रमाणे आज सत्यात उतरवण्याचे काम अविनाश यांनी केलं असून त्यांच्या या कर्तुत्वाला आमचा सलाम, आईना उत्तम दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनीलभैय्या देवकाते यांनी दिल्या.