मुख्याध्यापक संजय भापकर सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर व दादा जाधवराव विद्यालय जेजुरी येथील मुख्याध्यापक संजय लक्ष्मणराव भापकर तथा छोटे एस.एल.सर यांचा शासनाच्या नियत वयोमानानुसार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच लोणी भापकर येथील विद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर हे होते.
यावेळी मान्यवरांनी सर सेवेत असताना केलेल्या कामाचे कौतुक केले, त्यांनी इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांना चांगले धडे दिले, अनेक विद्यार्थी घडवले. अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत, उद्योग व्यवसायात काम करीत असल्याचे सांगितले तसेच मान्यवरांनी संजय भापकर सर यांना भरभरून शुभेच्छा देत त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कारही केला.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय ढोले, माणिकराव दांगडे पाटील सर, सुनील राजे भोसले, लालासाहेब गोलांडे, लोणी भापकरच्या सरपंच गीतांजली भापकर, मुरलीधर ठोंबरे, विजयसिंह भापकर, दारासिंग भापकर, रावसाहेब चोरमले, मुख्याद्यापक संदीप जगताप, केंद्रप्रमुख नाझीरकर साहेब, रोहन देवकाते, श्रीकांत कराडे, दिलीप जगदाळे, मुनीर तांबोळी, जयेश मारवाडी, हनुमंत भापकर, शंकरराव कोळेकर, पीआय रवींद्र लांबाते, पीएसआय सागर शिंदे, श्रीकांत भापकर सर, टी.पी.भापकर सर, डी.पी.जाधव सर, गायकवड मॅडम तसेच शाळेतील अनेक आजी माजी शिक्षक, शिक्षिका, माजी विद्यार्थी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कदम सर यांनी केले तर आभार तनपुरे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page