महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर, करंजे येथे रक्तदान शिबिर संपन्न


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदीर, करंजे येथे सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे, भारतीय पत्रकार संघ बारामती, आजी माजी सैनिक संघटना, सोमेश्वर भाविक भक्त व समस्त ग्रामस्थ सोमेश्वरनगर पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत १२५ बॉटल रक्त संकलित झाले.

Advertisement


या शिबिराचे उद्घाटन बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी सभापती निताताई फरांदे, श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी, सामाजिक कार्यकर्त्या सुचिता साळवे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्रामभाऊ सोरटे, मिलिंद कांबळे, लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले, अनिल खलाटे, उद्योजक संतोषराव कोंढाळकर, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून उद्घाटन करण्यात आले.
सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांच्या संकल्पनेतून महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सुखदेवराव शिंदे हे नियमित अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांनी राबविलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. शिबीर नियोजन बालाजी ब्लड सेंटर लोणंद यांनी केले. साई सेवा हॉस्पिटल वाघळवाडीचे डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे यांनी मोफत आरोग्य तपासणी केली.
याप्रसंगी बारामती दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, पंकज निलाखे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, करंजेचे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, उपसरपंच विष्णू दगडे, विपुल भांडवलकर, दिग्विजय जगताप, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संदिप जाधव, बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, सुशील अडागळे, निखिल नाटकर, अजित जगताप, संताजीराव गायकवाड, प्रतापराव गायकवाड, डॉ. अनिकेत उघडे, समाधान माने, सुहास जाधव, निखिल पगारे आदी मान्यवर तसेच भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page