लोणी भापकर येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता.बारामती) येथे महाराष्ट्र दीन, कामगार दिन आणि बुद्ध जयंतीनिमित्त भैरव ग्रुप, स्वच्छता अभियान ग्रुप व भैरवनाथ एकता ग्रुप यांच्यावतीने १ मे रोजी नुकतेच बांधकाम कामगार नोंदणी शिबीर घेण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन सरपंच गितांजली भापकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, माजी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, पोलीस पाटील संजय गोलांडे, उपसरपंच नंदकुमार मदने, सचिन भापकर आदी उपस्थित होते.
यावेळी कॉन्ट्रॅक्टर ऋषीकेश भापकर व दलित पँथर बारामती तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, कामगारांसाठी अनेक योजना आहेत. परंतु त्या योजनांचा उपयोग आपणास करता येत नाही, यातील काही योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरिता अशा मेळाव्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज रोजी कामगारांना २८ योजनांचा लाभ घेता येतो. तेव्हा कामगारांनी बांधकाम कामगार विभागाकडे रितसर नोंदणी केली पाहिजे. यावेळी उस्फुर्तपणे कामगारांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल सकाटे, अमोल मदने, प्रताप कडाळे, सुमित ठोंबरे, मनोज मदने तसेच स्वच्छता अभियान ग्रुप व भैरवनाथ एकता ग्रुप यांनी परिश्रम घेतले.