माळेगाव नगरपंचायत हद्दीतील योजना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
माळेगाव नगरपंचायत हद्दीतील बंद करण्यात आलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा प्रकारचे निवेदन बारामतीचे प्रांत अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
दि. 30 मार्च 2021 रोजी माळेगांव नगरपंचायतची स्थापना करण्यात आली त्या दिवसापासून नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या अनेक योजना बंद झाल्या आहेत. माळेगांव नगरपंचायत निवडणुक जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु घरकुल योजना किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना यासारख्या योजना लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संघटक चंद्रकांत वाघमोडे, बारामती तालुका अध्यक्ष ॲड.अमोल सातकर, बारामती ता. प्रभारी ॲड. दिलीप धायगुडे, काकासो बुरुंगले, हरिभाऊ घोडके, राहुल दंडवते, अतुल खरात, सुभाष साठे, योगेश दगडे, विकास बरकडे, प्रतीक गायकवाड, संजय माने, लहुराज कोकरे, सतीश वाघमोडे, महादेव कोकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.