कोमल गोळे यांना कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोमल गोळे यांना सन 2020-21 या वर्षीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
कोमल यांनी आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महीला कुस्तीपटू आहेत. त्यांनी वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत, अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदके मिळवली आहेत. तसेच सलग 5 वेळा पुणे महापौर केसरीचा किताब मिळवला आहे. त्यांनी पतियाळा येथे डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग-NIS ची पदवी A ग्रेड मिळवली आहे.
कोमल गोळे (यादव) या शिरंबे, कोरेगावच्या सुप्रसिद्ध यूट्यूबर् Sandy yadav यांच्या पत्नी व माजी सरपंच नामदेवराव यादव यांच्या सून आहेत.
कोमल गोळे यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे परिसरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.