विलास आबा भापकर मित्र मंडळाच्यावतीने लोणी भापकर परिसरातील १०० विद्यार्थ्यांना मोफत गणेश वाटप
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता. बारामती) येथे ग्रामविकास अधिकारी विलास हनुमंतराव भापकर यांच्या सेवापुर्तीनिमित्त विलास आबा भापकर मित्र मंडळाच्यावतीने लोणी भापकर केंद्रांतर्गत येणाऱ्या लोणी भापकर नंबर एक, लोणी भापकर नंबर दोन, शिंदेमळा, जगदाळेवस्ती, भापकरवस्ती, बारवकरमळा, ठोंबरेवस्ती आदी अंगणवाडीतील 100 मुला-मुलींना मोफत गणेश वाटप करण्यात आले.
विलास आबा मित्र मंडळाच्यावतीने गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम चालू असून यामध्ये माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील गोरगरीब व गरजू मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप केले जात आहे. तसेच अशोक पांडेकर यांच्या नावाने आदर्श विद्यार्थी पुरस्कारही देण्यात येत आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, उपसरपंच नंदकुमार मदने, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, माजी उपसरपंच आबा ठोंबरे, भैरवनाथ सोसायटीचे संचालक गोविंद बापू भापकर, भैरवनाथ सोसायटीचे संचालक नवनाथ भापकर, सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप जगदाळे, बारामती तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष गोरख बारवकर, स्वयंभूनगर सोसायटीचे चेअरमन विजय गोलांडे यांच्यासह सर्व अंगणवाडीतील शिक्षिका, मदतनीस व पालक उपस्थित होते.