विष्णू सिताराम भापकर यांचे दुःखद निधन
लोणी भापकर : डिजिटल महाराष्ट्र न्यूज
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील विष्णू सिताराम भापकर (वय 101) यांचे वृद्धकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.
बारामती पंचायत समितीने त्यांना आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित केलेले होते. त्यांनी लोणी भापकर ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांना राजकीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड होती. सायंबाच्यावाडीचे विद्यमान सरपंच जालिंदर भापकर यांचे ते वडील होत. आबा या नावाने ते या परिसरात परिचित होते.