वाकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंद्रजीत जगताप यांची निवड


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
वाकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंद्रजीत भूजंग जगताप यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. वाकीचे सरपंच तथा अध्यासी अधिकारी किसन बोडरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार (दि.३०) रोजी वाकी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
उपसरपंचपदासाठी इंद्रजीत जगताप यांचा एकमेव अर्ज आला होता. नामनिर्देशन पत्र छाननी करण्याच्या वेळेत प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली व प्राप्त नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे घोषित करण्यात आले.
इंद्रजीत जगताप यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी सरपंच बोडरे यांनी घोषित केले.
यावेळी माजी उपसरपंच हनुमंत जगताप, सदस्य सुधीर गायकवाड, वर्षाराणी जगताप, निकिता भंडलकर, सुनीता जगताप, शालन जगताप, कल्पना जगताप, पोलीस पाटील हनुमंत जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जगताप, ग्रामसेवक गणेश लडकत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page