बारामती तालुका शिवसेना आढावा मीटिंग संपन्न, शिवसेनेच्यावतीने बारामती विधानसभा लढवण्यात येणार
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
शिवसेना बारामती तालुका आढावा मीटिंग दि. 17 जून रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बारामती येथे संपन्न झाली. सदर मीटिंगमध्ये लोकसभेमध्ये बारामती तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना 48 हजाराची भरघोस आघाडी मिळाली असून त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बारामती शिवसेनेच्या वतीने तयारी करण्याचे एकमताने ठरले.
महाराष्ट्रात शिवसेनाच्या वतीने 288 जागेची तयारी करण्याची रणनीती असून त्याचाच एक भाग म्हणून बारामती विधानसभा लढवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी करण्याचे ठरले आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने, वाहतूक सेनेचे राजेंद्र पिंगळे, शहर प्रमुख राजेंद्र गलांडे, तालुका संघटक नंदू भागवत, विभाग प्रमुख बंटी गायकवाड, सतीश काटे, महिला आघाडीच्या चित्राताई पिसाळ, युवासेनेचे केशव शिंदे यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.